कोरोना विषाणू साथ जाणून घेऊ या

                इंडियन मेडिकल असोशियन
                          महाराष्ट्र राज्य

1.  काय आहे  कोरोना?

* हा एक विषाणू आहे
* तो वेगाने वाढतो
* एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वेगाने फसवतो
* आपल्या श्वसन संस्थेला बाधित करतो

2    कोरोना कसा पसरतो?

        अ) रुग्णाच्या खोकल्यातून

*  रुग्ण खोकल्याने हवेत तुषार उडतात
*  हे तुषार रुग्णाकडून हवेत पसरतात
*  या तुषारातील कणांमध्ये विषाणू असतात
*  आजूबाजूच्या व्यक्तींना श्वास घेतल्यावर त्यातून त्याचा            संसर्ग होतो
         
        आ) वस्तूच्या स्पर्शातून

*  रुग्णाच्या खोकल्यातून काही तुषार त्यातील विषाणूसह         आजूबाजूच्या वस्तू वर पडतात
*  त्या वस्तू आपल्या हाताचा स्पर्श झाल्यावर ते विषाणू            हातांना चिकटतात
*  त्यानंतर जर हात चेहऱ्याला किंवा नाकाला लावले तर ते        विषाणू आपल्या श्वास मार्गातून जाऊन संसर्ग होतो

3    आजाराची लक्षणे

*  सर्दी
*  घसा तीव्रपणे दुखणे
*  खोकला
*  श्वास घेण्यास त्रास होणे
*  डोकेदुखी
*  उलट्या व जुलाब

4     धोकादायक लक्षणे

*  तीव्र घसादुखी
*  अडतीस अंशापेक्षा  जास्त ताप असणे
*  धाप लागणे
*  छातीत दुखणे
*   खोकल्या वाटे रक्त पडणे
*  रक्तदाब कमी होणे
*  नखे निळसर पडणे
*  मुलांमध्ये चिडचिडपणा आणि झोपाळू पणा वाढणे

5     जास्त धोका कोणाला?

*   गरोदर माता
*  उच्च रक्तदाब
*  मधुमेयह
*  मूत्रपिंडाचे विकार
*  कर्करोग
*  दमा
*  जुना वसतात बळावणारा खोकला
*  कर्करोगाचे उपचार चालू असल्यास

6      आजार टाळण्यासाठी उपाय

*  डॉक्टरच्या सल्ल्याने मास्क वापरा
*  गर्दीची ठिकाणे टाळा
*  चेहऱ्याला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा
*  सनिटायझर किंवा साध्या साबण पाण्याने हात वरच्यावर        धुवावेत
*  खोकला किंवा शिंक आल्यास तोंडावर रुमाल किंवा टिशू        पेपर धरावा
*   टिशू लगेच कचरापेटीत टाकावा
* खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर हात धरू नये             त्याऐवजी कोपर वाकून ते तोंडासमोर धरावे
* ताप आणि खोकला असलेल्या रुग्णाचा सहवास टाळावा
*  तुम्ही या विषाणूने पसरलेल्या साथीच्या भागात प्रवास            केला असेल आणि जर ताप खोकला आणि श्वास घ्यायला      त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा गरज      वाटल्यास रुग्णालयात भरती व्हावे
*  प्राण्यांचा सहवास टाळावा त्यांना स्पर्श करू नये
*  पूर्ण शिजवलेले शाकाहारी व मांसाहारी अन्न खावे
*  पुरेशी आणि नेहमी झोप घ्यावी जागरण टाळावे
*  धूम्रपान टाळावे
*  मध्यपान टाळावे



Comments

Popular posts from this blog

स्वदेशी व भारतीय उत्पादन

Ministry of AYUSH has given ways to increase immunity

चील और मुर्गी